सोलापूर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला धक्का; आदित्य फत्तेपूरकरांचा अर्ज बाद
सही बनावट’ प्रतिज्ञापत्रामुळे काँग्रेस उमेदवार रिंगणाबाहेर सोलापूर, 03 जून (हिं.स.)। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज छानन
grdf


सही बनावट’ प्रतिज्ञापत्रामुळे काँग्रेस उमेदवार रिंगणाबाहेर

सोलापूर, 03 जून (हिं.स.)। सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान बाद ठरविण्यात आला आहे. अर्जावरील सूचक म्हणून करण्यात आलेली सही बनावट असल्याचे प्रतिज्ञापत्र नगरसेवक नागेश भोसले यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

विधान परिषद निवडणुकीसाठी एकूण नऊ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. छाननी प्रक्रियेदरम्यान काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या अर्जावर सूचक म्हणून असलेली सही आपण केलेली नसून ती बनावट असल्याचा दावा नागेश भोसले यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अर्जाची छाननी करून फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविला.

या घडामोडीमुळे निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, आता भाजपविरोधात कोण उमेदवार उभा राहणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 600 हून अधिक मतदारांच्या अपेक्षांवर या निर्णयामुळे पाणी फिरल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. दरम्यान, ज्ञानदेव वाघमोडे यांचा उमेदवारी अर्जही बाद ठरविण्यात आला. त्यांनी भाजप सदस्यांच्या बनावट सह्या करून अर्ज दाखल केल्याची तक्रार संबंधित सदस्यांनी केली होती. चौकशीनंतर ही तक्रार ग्राह्य धरत त्यांचा अर्जही फेटाळण्यात आला. या प्रकरणामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेस आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande