पुणे विधान परिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट; प्रदीप कंद यांचा अपक्ष अर्ज वैध
पुणे, 03 जून (हिं.स.) पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सात उमेदवारांपैकी सहा जणांचे अर्ज वैध ठरले असून, एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला आहे. विशेष म्ह
grdf


पुणे, 03 जून (हिं.स.) पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सात उमेदवारांपैकी सहा जणांचे अर्ज वैध ठरले असून, एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांचा अपक्ष उमेदवार म्हणून दाखल केलेला अर्ज ग्राह्य धरला गेल्याने निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. छाननी प्रक्रियेदरम्यान अपक्ष उमेदवार उमेश म्हेत्रे यांचा अर्ज नियमांतील त्रुटींमुळे बाद ठरविण्यात आला. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे अधिकृत उमेदवार विक्रम काकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे श्रीकांत पाटील तसेच अन्य उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.

छाननीदरम्यान सर्वाधिक चर्चा विक्रम काकडे यांच्या उमेदवारी अर्जाबाबत झाली. त्यांच्या विरोधात महापालिकेचा मिळकतकर थकीत असल्याचा तसेच त्याचा प्रतिज्ञापत्रात उल्लेख नसल्याचा आक्षेप श्रीकांत पाटील यांच्या वतीने घेण्यात आला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी हा आक्षेप फेटाळून लावला. मिळकतकराची थकबाकी ही लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी वैध कारण ठरत नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी विक्रम काकडे यांचा अर्ज वैध ठरविला. या निर्णयामुळे विक्रम काकडे यांना मोठा दिलासा मिळाला असून, आता निवडणुकीतील पुढील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande