सोलापूर - पोलिओमुक्त भारतासाठी विशेष मोहीम; 1,160 आरोग्य कर्मचारी सज्ज
सोलापूर, 03 जून, (हिं.स.) - राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत शहरातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील सुमारे एक लाख सहा हजार बालकांना 28 जून रोजी पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार आहेत. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिका प्रशासन
Puls Polio


सोलापूर, 03 जून, (हिं.स.) - राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत शहरातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील सुमारे एक लाख सहा हजार बालकांना 28 जून रोजी पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार आहेत. मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिका प्रशासनाने व्यापक तयारी केली असून, तब्बल 1,160 आरोग्य कर्मचारी या मोहिमेत सहभागी होणार आहेत.

देशव्यापी पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी, 28 जून रोजी बालकांना तोंडावाटे पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सिटी टास्क फोर्सची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस आरोग्याधिकारी डॉ. राखी माने, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क अधिकारी अजित खानसोळे, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे डॉ. संतोष जोगदंड, डॉ. रोहन वायचळ, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील डॉ. पाटील तसेच जिल्हा माता-बाल संरक्षण अधिकारी अविनाश मगर उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेत मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी व्यापक जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या.

शाळांच्या माध्यमातून पालकांपर्यंत मोहिमेची माहिती पोहोचविण्यावर भर देण्यात आला. तसेच शहरातील विविध लॉजमध्ये वास्तव्यास असलेल्या पात्र बालकांचे प्राधान्याने लसीकरण करण्याचे निर्देशही देण्यात आले. पोलिओ निर्मूलनाच्या राष्ट्रीय उद्दिष्टाला बळकटी देण्यासाठी सर्व पालकांनी आपल्या पाच वर्षांखालील बालकांना पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande