रत्नागिरीत जून महिन्यात सरासरीच्या १४.३९ टक्के पाऊस
रत्नागिरी, 30 जून (हिं.स.) । रत्नागिरी जिल्ह्यात जून महिन्यात वार्षिक सरासरीच्या केवळ १४.३९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात काल (दि. २९ जून) मोसमी पावसाचा जोर कायम होता. आजही सकाळपासून अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. दरम्यान, सकाळी संपलेल्य
रत्नागिरीत जून महिन्यात सरासरीच्या १४.३९ टक्के पाऊस


रत्नागिरी, 30 जून (हिं.स.) । रत्नागिरी जिल्ह्यात जून महिन्यात वार्षिक सरासरीच्या केवळ १४.३९ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात काल (दि. २९ जून) मोसमी पावसाचा जोर कायम होता. आजही सकाळपासून अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. दरम्यान, सकाळी संपलेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी १०६ मिलिमीटर पाऊस पडला. सर्वाधिक १४४ मिलिमीटर पाऊस रत्नागिरी तालुक्यात, १२८ मिलिमीटर पाऊस गुहागरमध्ये, तर १२० मिलिमीटर पाऊस मंडणगडमध्ये पडला. संगमेश्वरात १११, राजापुरात १०६, दापोलीत १०५, चिपळुणात ८८, लांज्यात ८५, तर खेडमध्ये ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

एक जून ते ३० जून या कालावधीत जिल्ह्यात सरासरीच्या १४.३९ टक्के पाऊस नोंदवला गेला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २७ टक्के पाऊस झाला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande