
नांदेड, 30 जून (हिं.स.)। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने नांदेड दक्षिण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बीएलए-2 प्रशिक्षण वर्ग अंबिका मंगल कार्यालय नायगाव येथे देगलूर,मुखेड, बिलोली, उमरी, धर्माबाद तालुक्यातील भारत रक्षकाचा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी बीएलए-2 पदाधिकाऱ्यांना मतदार यादी विशेष पुनरीक्षण (एसआयआर), बूथस्तरीय नियोजन, संघटन बळकटीकरण तसेच आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने करावयाच्या कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तालुक्याचे तालुकाध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis