पीएम- शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याचे आवाहन; इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना लाभ
रायगड, 30 जून (हिं.स.)। अलिबाग : केंद्र शासनाच्या पीएम-यशस्वी योजनेंतर्गत अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी योजनेसाठी अर्ज https://scholarships.gov.in/ या पोर्टलवर ऑनलाईन भरणे. इयत्ता ९ वी ते १२ वीमध
Call-for-applications-for-the-


रायगड, 30 जून (हिं.स.)। अलिबाग : केंद्र शासनाच्या पीएम-यशस्वी योजनेंतर्गत अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी योजनेसाठी अर्ज https://scholarships.gov.in/ या पोर्टलवर ऑनलाईन भरणे. इयत्ता ९ वी ते १२ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर (NSP) ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन रायगड येथील इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक सुनील जाधव यांनी केले आहे.

ओबीसी, विमुक्त जाती-भटक्या जमाती (VJNT) व विशेष मागास प्रवर्ग (SBC) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी National Scholarship Portal (NSP) वर अर्ज भरावेत. अर्ज भरल्यानंतर संबंधित शाळा अथवा महाविद्यालयाच्या नोडल अधिकाऱ्यांकडून त्यांची ऑनलाईन पडताळणी केली जाणार आहे.

इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी PM-YASASVI Pre Matric Scholarship, तर इयत्ता ११ वी व १२ वी तसेच पुढील शिक्षणासाठी PM-YASASVI Post Matric Scholarship योजना लागू आहे. ज्या शाळा व महाविद्यालयांनी अद्याप NSP पोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी तातडीने संस्थेची नोंदणी करावी. पूर्वी नोंदणी केलेल्या संस्थांनी आपला प्रोफाइल अद्ययावत करून विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

या योजनेसाठी विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थ्यांची निवड मागील वर्गातील गुणवत्तेनुसार करण्यात येणार असून मुलींसाठी किमान ३० टक्के आरक्षण राखीव आहे. तसेच विद्यार्थ्यांची किमान ७५ टक्के आधार प्रमाणीकरणासह उपस्थिती आवश्यक आहे.इयत्ता ९ वी व १० वीतील विद्यार्थ्यांना प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती अंतर्गत वार्षिक ४,००० रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. पोस्ट-मॅट्रिक योजनेत शासनाने मान्य केलेल्या अभ्यासक्रमानुसार शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी (Direct Benefit Transfer) पद्धतीने जमा केली जाईल.

अर्ज करताना विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास), उत्पन्नाचा दाखला, बोनाफाईड प्रमाणपत्र, आधार क्रमांकाशी संलग्न उपस्थितीची नोंद, मागील वर्षाचे गुणपत्रक तसेच वैध बँक खात्याची माहिती तयार ठेवावी.रायगड जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी तसेच सर्व माध्यमिक शाळा व महाविद्यालयांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक सुनील जाधव यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande