
लातूर, 30 जून, (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री तथा बंजारा समाजाचे राष्ट्रीय नेते नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले. मंत्री संजय भाऊ राठोड यांनी जलसंधारण विभागाच्या वतीने गेल्या दहा वर्षात अनेक बंधारे, तलाव, नालासरळीकरण अशा विविध समाजोपयोगी योजना प्रभावीपणे राबवून राज्यात जलक्रांती घडून आणली असून जनसामान्यांसाठी सदैव तत्पर राहणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. असे नेते महाराष्ट्राला लाभले ही भाग्यच आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप करून संजय भाऊंचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी संजय भाऊचे अनेक चाहते यांनी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी कामना केली त्यावेळी उदगीरचे संजय भाऊ चे खंदे समर्थक संजय राठोड ,अमित राठोड, संतोष भोपळे, लक्ष्मण चव्हाण, केदार पुराणिक,परमेश्वर बापटले,विनोद चव्हाण, राहुल चव्हाण, प्रशांत राठोड ,नामदेव राठोड ,भानुदास राठोड, धोंडीराम हिंगेमिरे, लखन पुरी, अनिल नायक, संतोष राठोड, सतीश राठोड, जयपाल चव्हाण, अंकुश चव्हाण, नरेश सक्सेना, धीरज चव्हाण, मारुती माडे ,अभय यमलवार,अनिल पटवारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis