नाशिक - डॉक्टर्स डेनिमित्त आयएमएकडून होणार डॉक्टरांचा गौरव
नाशिक, 30 जून (हिं.स.)। आयएमए, नाशिक शाखेतर्फे नॅशनल डॉक्टर्स डे २०२६ निमित्त बुधवार, दि. १ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता शालिमार येथील आयएमए भवनातील डॉ. एच. एस. जोशी हॉल येथे डॉक्टरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती आयएमए नाशि
नाशिक - डॉक्टर्स डेनिमित्त आयएमएकडून होणार डॉक्टरांचा गौरव


नाशिक, 30 जून (हिं.स.)। आयएमए, नाशिक शाखेतर्फे नॅशनल डॉक्टर्स डे २०२६ निमित्त बुधवार, दि. १ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता शालिमार येथील आयएमए भवनातील डॉ. एच. एस. जोशी हॉल येथे डॉक्टरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती आयएमए नाशिक शाखेचे अध्यक्ष डॉ. विशाल पवार व अन्य पदाधिकार्यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी सचिव डॉ. पंकज भाट, खजिनदार डॉ. सागर भालेराव, उपाध्यक्ष डॉ. निकिता पाटील, उपाध्यक्ष डॉ. जोगेश बच्छाव आदि उपस्थित होते.

यंदा डॉ. रत्ना अष्टेकर, डॉ. विजय अहिरराव, डॉ. रुमी पटेल, डॉ. रामकांत पाटील, डॉ. अभयसिंह वालिया, डॉ. समीर चंद्रात्रे यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे डॉ. पवार म्हणाले. पुरस्कार निवड समितीची जबाबदारी डॉ. पंकज गुप्ता, डॉ. विजय घाडगे, डॉ. हेमंत सोननीस यांनी सांभाळली.

यंदाच्या कार्यक्रमाची संकल्पना ‘सत्कार निःस्वार्थ सेवेचा‘ अशी असून, समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणार्या वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात मानसोपचारतज्ज्ञ व मॅगसेसे पुरस्कार विजेते पद्मश्री डॉ. भारत वाटवाणी तसेच खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत यमुनाबाई जोशी हॉल, आयएमए नाशिक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande