
छत्रपती संभाजीनगर, 30 जून (हिं.स.) : शिक्षक प्रवर्गातील ७३ जागांची भरती प्रक्रिया सध्या सुरु आहे. पहिल्या टप्प्यात प्राध्यापक प्रवर्गातील सात जागांसाठी २ जुलै या दरम्यान मुलाखती घेण्यात येणार आहेत. यामध्ये प्राणीशास्त्र व पर्यावरणशास्त्र या विभागातील दोन जागांसाठी मुलाखती घेण्यात आल्या. तर वन्स्पतीशास्त्र, १ जुलै - इतिहास व इंग्रजी, २ जुलै -हिंदी या प्रमाणे सहा विभागातील सात जागांसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. एकुण ५१ उमेदवारांना मुलाखती पत्रे पाठविण्यात आली आहेत. संबंधित उमेदवारांची सकाळी ८ ते ११ या वेळेत कागदपत्रांची पडताळणी होऊन लगेच मुलाखती सुरु करण्यात येणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis