जळगाव - जि. अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात खाजगी  भुकरमापक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव, 30 जून, (हिं.स.) जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, जळगाव यांच्या अधिनस्त कार्यालयामध्ये मोजणी कामासाठी खाजगी संस्थेमार्फत खाजगी भुकरमापक नियुक्ती करण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच
जळगाव - जि. अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात खाजगी  भुकरमापक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन


जळगाव, 30 जून, (हिं.स.) जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, जळगाव यांच्या अधिनस्त कार्यालयामध्ये मोजणी कामासाठी खाजगी संस्थेमार्फत खाजगी भुकरमापक नियुक्ती करण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता किमान स्थापत्य अभियांत्रिकी पदवी / पदविका अथवा आयटीआय संस्थेतील सर्व्हेअर (Surveyor) कोर्स पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज तसेच आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, जळगाव कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे संपर्क साधून अर्ज सादर करावे असे आवाहन भूमि अभिलेख जिल्हा अधीक्षक काशिनाथ मोरे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande