
परभणी, 30 जून (हिं.स.)।भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) परभणी शाखेचे मुख्य प्रबंधक एस. एल. पोपुलवार हे 36 वर्षे 10 महिन्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवेनंतर मंगळवार 30 जून रोजी सेवानिवृत्त होत झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने परभणी शाखेच्या वतीने सोमवारी श्री मंगल कार्यालय येथे ‘सेवापूर्ती गौरव समारंभ’ व सपत्नीक सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी परभणी शाखेचे मुख्य प्रबंधक गणेश धाग हे होते. प्रमुख अतिथी म्हणून नांदेडचे वरिष्ठ मंडळ प्रबंधक अभय कुलकर्णी, विपणन प्रबंधक रवी वर्मा दाटला, डी. रामचंदर, सहाय्यक विभाग व्यवस्थापक प्रकाश दीक्षित यांची उपस्थिती होती. यावेळी अभय कुलकर्णी, रवी वर्मा दाटला, प्रकाश दीक्षित, एस. एल. पोपुलवार, पंडित लोकडे, संतोष शिंदे, भास्कर हिप्परगे, संपत कपाळे, अनिल शेळके, गिरीश देशपांडे, काळे आदींनी मनोगत व्यक्त करताना पोपुलवार यांच्या कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि सेवाभावी कार्याचा गौरव केला. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळात एलआयसीच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला.
विमा कामगार संघटना, नांदेड विभागाचे अध्यक्ष कॉम्रेड शमशोदिन शेख यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन पोपुलवार यांचा सत्कार केला. तसेच एनओआयडब्ल्यू अँड एससी-एसटी वेल्फेअर असोसिएशन, परभणी शाखेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी एलआयसीचे कर्मचारी, अधिकारी, विकास अधिकारी, विमा प्रतिनिधी तसेच आयुर्विमा महामंडळाचे निवृत्त अधिकारी व पेन्शनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोपुलवार यांच्या पुढील आयुष्यासाठी सर्व उपस्थितांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis