लातूर जिल्ह्यात जूनअखेर केवळ ६८.१ टक्के पावसाची नोंद
लातूर, 30 जून (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात ३० जून २०२६ अखेरपर्यंत सरासरी १३५.४ मिमी पावसाच्या तुलनेत ९२.२ मिमी पावसाची नोंद झाली असून, ही सरासरीच्या ६८.१ टक्के आहे. जिल्ह्यात जून महिन्यात एकूण १० पावसाचे दिवस नोंदविण्यात आले आहेत. तालुकानिहाय आकडेवार
कमी पाऊस


लातूर, 30 जून (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात ३० जून २०२६ अखेरपर्यंत सरासरी १३५.४ मिमी पावसाच्या तुलनेत ९२.२ मिमी पावसाची नोंद झाली असून, ही सरासरीच्या ६८.१ टक्के आहे. जिल्ह्यात जून महिन्यात एकूण १० पावसाचे दिवस नोंदविण्यात आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारीनुसार जळकोट तालुक्यात सर्वाधिक २१०.४ मिमी पाऊस झाला असून, तो सरासरीच्या २०७.१ टक्के आहे. त्यानंतर रेणापूरमध्ये १२०.० मिमी (१०४.२ टक्के), उदगीरमध्ये १०५.१ मिमी (८४.८ टक्के), अहमदपूरमध्ये ९९.८ मिमी (६९.४ टक्के), लातूर तालुक्यात ९७.१ मिमी (६७.९ टक्के), निलंग्यात ८८.२ मिमी (६३.७ टक्के), औशात ७६.६ मिमी (५६.२ टक्के), देवणीत ६१.१ मिमी (५७.२ टक्के), शिरूर अनंतपाळमध्ये ५९.१ मिमी (६२.७ टक्के), तर चाकूर तालुक्यात सर्वात कमी ५६.० मिमी (४०.७ टक्के) पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात काही भागांत समाधानकारक पाऊस झाला असला तरी अनेक तालुक्यांमध्ये अद्याप सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी आगामी काही दिवसांतील पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार उशिराने प्राप्त होणाऱ्या माहितीमुळे पुढील तीन दिवसांत या पर्जन्यमानाच्या आकडेवारीत किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande