आ. अमल महाडीक यांच्याकडून कोल्हापूर शहरासाठी स्वखर्चातून 1100 एलईडी दिवे
कोल्हापूर, 30 जून (हिं.स.)| शहरातील व उपनगरातील बंद पडलेल्या पथदिव्यांमुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत असल्याची बाब लक्षात घेऊन लोकसहभागातून पथदिवे उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमांतर्गत भाजपचे करवीर दक्षिणचे आमदार अमल महाडीक यांच्या माध्यमा
महापौर रुपाराणी निकम व इतर एलईडी पथदिवे देताना


कोल्हापूर, 30 जून (हिं.स.)| शहरातील व उपनगरातील बंद पडलेल्या पथदिव्यांमुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत असल्याची बाब लक्षात घेऊन लोकसहभागातून पथदिवे उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमांतर्गत भाजपचे करवीर दक्षिणचे आमदार अमल महाडीक यांच्या माध्यमातून मंगळवारी महापालिकेला तिसऱ्या टप्प्यात १,१०० एलईडी पथदिवे सुपूर्द करण्यात आले.

कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौक येथे आयोजित कार्यक्रमात महापौर रुपाराणी निकम यांनी हे एलईडी पथदिवे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडे सुपूर्द केले. शहरातील विविध भागांतील बंद पडलेले पथदिवे तातडीने बदलण्यासाठी हे दिवे सर्व सदस्यांच्या प्रभागांमध्ये वितरित करण्यात येणार आहेत. शहरातील पथदिव्यांच्या बदलासाठी महापालिकेवर आर्थिक भार न टाकता लोकसहभागातून दिवे उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार अमल महाडीक यांनी यापूर्वी दिली होती. त्यानुसार एकूण २,५०० एलईडी पथदिवे देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या निविडणूकीच्या काळात १,००० दिवे त्यांनी बसविले होते. तर दुसऱ्या टप्प्यात ७०० दिवे बसविण्यात आले आहेत. आता तिसऱ्या टप्प्यात १,१०० एलईडी पथदिवे महापालिकेला उपलब्ध करून देण्यात आले असून आवश्यकतेनुसार आणखी दिव्यांचीही उपलब्धता आमदार अमल महाडीक यांच्याकडून करून दिली जाणार असलेचे नगरसेवक जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उप-महापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, उपसभापती दिपा ठाणेकर, सभागृहनेता मुरलीधर जाधव आदी पदाधिकारी आणि पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande