
बीड, 30 जून (हिं.स.) : काडीवडगाव येथील प्रगतशील आणि कष्टाळू शेतकरी स्वर्गीय श्री. गोकुळ गवारे यांचे यशवाडी येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात निधन झाले. ही घटना अत्यंत वेदनादायी असून मन सुन्न करणारी असल्याची प्रतिक्रिया माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केली आहे.
अधिवेशन सुरू असल्यामुळे तत्काळ भेट देणे शक्य झाले नव्हते, अशी माहिती त्यांनी दिली. त्यानंतर त्यांनी गवारे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले व या कठीण प्रसंगी धीर दिला.
गोकुळ गवारे यांनी आपल्या कष्ट, प्रामाणिकपणा आणि शेतीतील प्रगतशील कार्यामुळे परिसरात वेगळी ओळख निर्माण केली होती, असेही आमदार सोळंके यांनी नमूद केले. “नियतीने त्यांच्यावर असा आघात करावा, ही अत्यंत दुःखद बाब आहे,” असे त्यांनी सांगितले.
या कठीण प्रसंगी आम्ही गवारे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis