माजलगावात अत्याधुनिक फिजिओथेरपी उपचार केंद्राचे उद्घाटन
बीड, 30 जून (हिं.स.) : माजलगाव शहरात फिजिओथेरपीच्या माध्यमातून अत्याधुनिक उपचारांची सोय उपलब्ध झाली असल्याची माहिती आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली आहे. फिजिओथेरपी ही आजच्या काळाची गरज बनली असून, औषधांशिवाय वेदनामुक्त जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी ही उ
अ


बीड, 30 जून (हिं.स.) : माजलगाव शहरात फिजिओथेरपीच्या माध्यमातून अत्याधुनिक उपचारांची सोय उपलब्ध झाली असल्याची माहिती आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली आहे. फिजिओथेरपी ही आजच्या काळाची गरज बनली असून, औषधांशिवाय वेदनामुक्त जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी ही उपचारपद्धती प्रभावी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

माजलगाव येथे डॉ. प्रशांत राऊत यांच्या श्री फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी त्यांनी सांगितले की, महानगरांमध्ये या उपचारपद्धतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, आता ही सुविधा माजलगावमध्ये उपलब्ध होणे हे नागरिकांसाठी महत्त्वाचे पाऊल आहे.

“फिजिओथेरपी उपचारपद्धतीचा मी स्वतः अनुभव घेतला असून त्याचा मला प्रत्यक्ष लाभ झाला आहे,” असेही आमदार सोळंके यांनी यावेळी सांगितले. स्ट्रोक (अर्धांगवायू) झालेल्या रुग्णांचे पुनर्वसन, सांधेदुखी, मणक्याचे विकार, क्रीडा दुखापती आणि इतर शारीरिक समस्यांवर फिजिओथेरपी प्रभावी उपचार देते, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. प्रशांत राऊत यांनी धाडसाने सुरू केलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या. ही सेवा अधिकाधिक रुग्णांना निरोगी आणि वेदनामुक्त जीवन देणारी ठरो, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande