
नांदेड, 30 जून, (हिं.स.)। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमरी मतदारसंघातून उमरी भाजपाचे नेते उद्योजक मारोतराव व्यंकटराव पा कवळे गुरुजी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
तर धर्माबाद मतदारसंघातून सागरबाई मारोतराव पा कवळे गुरुजी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. ग्रामीण आणि निम-शहरी भागातील शेती व सहकार क्षेत्राला आर्थिक पाठबळ देण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी,सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास जपत सहकार क्षेत्राच्या विकासासाठी सभासद मतदारांच्या आशिर्वादाने व समर्पित भावनेने कार्य करण्याचा त्यांचा संकल्प आहे.
यावेळी उमरी धर्माबाद भाजपाचे अनेक पदाधिकारी सभासद मतदार बंधू भगिनीं व कार्यकर्ते यांच्यासह अनेक जेष्ठ, युवक सहकारी उपस्थित होते.
----------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis