
नांदेड, 30 जून (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील नेत्या मीनल पाटील खतगावकर यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बिलोली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
ते म्हणाले, तालुक्यातील सभासद मतदार, पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. राज्याचे माजी मंत्री तथा खासदार भास्करराव पाटील खतगावकर साहेब यांचे आशीर्वाद आणि सर्वांच्या विश्वासाच्या बळावर ही वाटचाल अधिक दृढ झाली आहे. आपल्या प्रेम, विश्वास आणि मतदानरूपी आशीर्वादाच्या बळावर सहकार क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis