नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी आ. तुषार राठोड यांचे नामांकन दाखल
नांदेड, 30 जून (हिं.स.) : भारतीय जनता पक्षाचे आमदार तुषार राठोड यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी संचालक पदाकरिता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याचबरोबर गंगाधररावजी राठोड यांनीही अधिकृत नामांकन अर्ज दाखल केला. नामांकन दाखल
अ


नांदेड, 30 जून (हिं.स.) : भारतीय जनता पक्षाचे आमदार तुषार राठोड यांनी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी संचालक पदाकरिता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याचबरोबर गंगाधररावजी राठोड यांनीही अधिकृत नामांकन अर्ज दाखल केला.

नामांकन दाखल करताना आमदार तुषार राठोड यांनी हा अर्ज केवळ एका पदासाठी नसून जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी आणि व्यापारी बांधवांना सहकार क्षेत्रातून भक्कम न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे सांगितले.

“मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून माझ्या मतदारसंघातील जनतेचे हित आणि बँकेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या प्रसंगी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन आणि पाठबळ लाभल्याचेही त्यांनी नमूद केले. नामांकन दाखल करताना भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे, चैतन्य बापू देशमुख, भाजप नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष डॉ. किशोर देशमुख, भाजप नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे आणि भाजप मुखेड विधानसभा प्रमुख खुशालराव पाटील उमरदरीकर आदी उपस्थित होते.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande