आरपी हॉस्पिटलने ९५ टक्के ब्लॉकेज असलेल्या ७० वर्षीय वृद्धावर केली यशस्वी शस्त्रक्रिया
परभणी, 30 जून (हिं.स.)। ९५ टक्के ब्लॉकेज असलेल्या ७० वर्षीय वृद्धावर बायपास न करता '' यशस्वी मोफत कटिंग बलून''द्वारे शस्त्रक्रिया करुन जिवनदान दिल्याची किमया ''आरपी हॉस्पिटलने साधली आहे. ग्रामीण भागातील एका ७० वर्षीय पुरुष रुग्णाला छातीत तीव्
आरपी हॉस्पिटलने ९५ टक्के ब्लॉकेज असलेल्या ७० वर्षीय वृद्धावर केली यशस्वी शस्त्रक्रिया


परभणी, 30 जून (हिं.स.)। ९५ टक्के ब्लॉकेज असलेल्या ७० वर्षीय वृद्धावर बायपास न करता ' यशस्वी मोफत कटिंग बलून'द्वारे शस्त्रक्रिया करुन जिवनदान दिल्याची किमया 'आरपी हॉस्पिटलने साधली आहे.

ग्रामीण भागातील एका ७० वर्षीय पुरुष रुग्णाला छातीत तीव्र वेदना होऊ लागल्याने त्यांना तातडीने 'आरपी हॉस्पिटल' मध्ये दाखल करण्यात आले. रुग्णाची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. रुग्णालयात आणताच डॉक्टरांनी तत्परतेने त्यांचा ईसीजी काढला, ज्यामध्ये हृदयविकार संबंधी गंभीर बदल दिसून आले. आरपी हॉस्पिटलच्या अत्याधुनिक कार्डिओलॉजी विभागातील तज्ज्ञ व अनुभवी हृदयविकार तज्ज्ञ डॉ. दीपक कुबडे यांनी रुग्णाचा 'टू-डी इको' केला. रुग्णाची गंभीर अवस्था पाहता, त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ अत्याधुनिक कार्डियाक केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले. अँजिओग्राफीच्या अहवालात एक अत्यंत आव्हानात्मक बाब समोर आली; यात प्रामुख्याने हृदयाला ९० टक्के रक्त पुरवठा करणाऱ्या डाव्या रक्तवाहिनीच्या तोंडाला तब्बल ९५ टक्के ब्लॉकेज होते. त्यामुळे नैसर्गिकरित्या हृदयाला दुसऱ्या रक्त वाहिनी तयार होऊन त्या रक्तवाहिनीद्वारे रक्त पुरवठा होणे शक्य नव्हते. त्यातच या ब्लॉकेजमध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमालीचे अधिक असल्याने ती रक्तवाहिनी अत्यंत कठीण झाली होती.दरम्यान, हृदयविकार तज्ज्ञ डॉ. दीपक कुबडे यांनी सांगितले की साधारणतः अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या केसेसमध्ये रुग्णाला तातडीने 'बायपास सर्जरी' करावी लागते. परंतु डाव्या रक्तवाहिनीच्या तोंडाशी असलेले ब्लॉकेज आणि कॅल्शियमचे कठीण थर पाहता, आम्ही अत्यंत आधुनिक अशा 'हाय प्रेशर कटिंग बलूम तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. हे तंत्रज्ञान आणि शस्त्रक्रिया अत्यंत किचकट आणि जोखमीची असते ऑपरेशन दरम्यान रुग्णांच्या जीवाला देखील होवू शकतो. आरपी हॉस्पिटलमधील जागतिक दर्जाची अत्याधुनिक उपकरणे आणि डॉ. कुबडे यांच्या वैद्यकीय कौशल्यामुळे ही अवघड शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वीपणे पार पडली. रक्तवाहिनीतील कॅल्शियमयुक्त कठीण ब्लॉक अत्यंत सुरक्षितपणे काढून रक्तप्रवाह पूर्ववत सुरळीत करण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला काही दिवस 'कार्डियाक आयसीयूमध्ये तज्ज्ञांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. रुग्ण पूर्णपणे बरा झाल्यानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. रूग्णाची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. खाजगी रुग्णालयात या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी साधारणतः ४ ते ५ लाख रुपयांचा खर्च येणार होता. एवढी मोठी रक्कम उभी करणे या गरीब कुटुंबाच्या आवाक्याबाहेर होते. परंतु, रुग्णाच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून आरपी हॉस्पिटल प्रशासनाने आपली सामाजिक बांधिलकी जपली. हॉस्पिटलने स्वतः पुढाकार घेऊन रुग्णाला 'महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना' आणि 'प्रधानमंत्री जन आरोग्य योजने'चा १०० टक्के लाभ मिळवून दिला. यामुळे रुग्णावर झालेले सर्व महागडे उपचार आणि ही क्लिष्ट शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत झाली.याबद्दल रुग्णालयाचे प्रमुख आमदार डॉ. राहुल पाटील व रुग्णालय व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी डॉक्टरांचे अभिनंदन केले

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande