छ. संभाजीनगर - विद्यापीठ निधीतून ११६ शिक्षकांची भरती
छत्रपती संभाजीनगर, 30 जून (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एकत्रित निधीतून वेतनावर विविध ३८ विभागात शिक्षकांची ११६ पदे भरण्यात येणार आहेत. १५ जुलै या काळात ऑनलाईन आवेदन मागविण्यात आले असून उमेदवारांची लेखी परीक्षा. मुलाखती द्वा
छ. संभाजीनगर - विद्यापीठ निधीतून ११६ शिक्षकांची भरती


छत्रपती संभाजीनगर, 30 जून (हिं.स.)। डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एकत्रित निधीतून वेतनावर विविध ३८ विभागात शिक्षकांची ११६ पदे भरण्यात येणार आहेत. १५ जुलै या काळात ऑनलाईन आवेदन मागविण्यात आले असून उमेदवारांची लेखी परीक्षा. मुलाखती द्वारे पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी दिली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षक प्रवर्गातील २८९ शासन मान्य पदे असून १६० पदे सध्या रिक्त आहेत. प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक प्रवर्गातील ७३ पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तथापि रिक्त पदांची संख्या मोठी असल्याने एकत्रित वेतनावरी पदे भरण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे. मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षात एकत्रित वेतनावर शिक्षकांची ११ महिन्यासाठी भरती करण्यात आली. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी एकत्रित वेतनावर सहायक प्राध्यापकांची ११६ पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील ३० विभाग, धाराशिव उपपरिसर येथील ७ विभाग व दिनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्र अशा ३८ विभागात मिळून ११६ पदे भरण्यात येणार आहेत. ११ महिन्यासाठी भरण्यात येणा-या या शिक्षकांना ३२ हजार रूपये मासिक वेतन देण्यात येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समर्थ पोर्टलवरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदन मागविण्यात आले असून यांची लिंक विद्याीपठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. ३० जून ते १५ जुलै या काळात उमेदवारांना ऑनलाईन आवेदन दाखल करता येणार आहेत. तर २० जुलै पर्यंत कागदपत्रांसह दोन प्रतीत अस्थापना विभागात संबंधित उमेदवारांनी आवेदनाची ’हॉर्डकॉपी’ पाठवावी. यानंतर लेखी परीक्षेची तारीख विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून जाहीर करण्यात येईल, असे कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी कळविले आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande