रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या अध्यक्षपदी डॉ. संदीप करे
रत्नागिरी, 30 जून (हिं.स.) । रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या अध्यक्षपदी डॉ. संदीप करे यांची निवड झाली. मावळत्या अध्यक्ष आणि डॉ. करे यांच्या पत्नी सौ. सपना करे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा हॉटेल संगम रेस
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा


रत्नागिरी, 30 जून (हिं.स.) । रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या अध्यक्षपदी डॉ. संदीप करे यांची निवड झाली. मावळत्या अध्यक्ष आणि डॉ. करे यांच्या पत्नी सौ. सपना करे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.

नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा हॉटेल संगम रेसिडेन्सी येथे झाला. गेली २१ वर्षे सामाजिक बांधिलकी जपत विविध सेवाभावी उपक्रमांद्वारे रत्नागिरीत वेगळी ओळख निर्माण केलेल्या रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या या सोहळ्यास इंस्टॉलेशन ऑफिसर तथा प्रमुख पाहुणे सुहास जोशी (DGND 3172), अशोक नाईक (DGND 3171), असिस्टंट गव्हर्नर श्रीकांत भुर्के आणि असिस्टंट गव्हर्नर अविनाश पालशेतकर उपस्थित होते.

मावळत्या अध्यक्षा डॉ. सौ. स्वप्ना करे यांनी आपल्या मनोगतात वर्षभरातील कार्याचा आढावा घेत सर्व सहकारी, सदस्य आणि कुटुंबीयांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी राजेंद्र कदम, वामन सावंत आणि सीताराम सावंत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

क्लबचे सेक्रेटरी राजेंद्र कदम यांनी वार्षिक अहवाल सादर करताना ग्रामीण भागातील वैद्यकीय शिबिरे, शाळकरी मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यशाळा, हिरकणी कक्षांना खुर्च्यांचे वाटप, गरोदर व स्तनदा मातांना प्रोटीन पावडरचे वितरण, शैक्षणिक साहित्य वाटप तसेच महिला बचत गटांसाठी आर्थिक साक्षरता कार्यक्रम अशा विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला.

सुहास जोशी यांच्या हस्ते डॉ. संदीप करे यांना अध्यक्षपदाची पिन व कॉलर प्रदान करून २०२६-२७ या वर्षासाठी अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आली. सीताराम सावंत यांनी सेक्रेटरी, तर विनायक निकम यांनी खजिनदार म्हणून पदभार स्वीकारला.

नूतन अध्यक्ष डॉ. संदीप करे यांनी आगामी वर्षासाठी विविध समाजोपयोगी उपक्रमांचे नियोजन केले असून परस्पर विश्वास, मैत्री, सहकार्य आणि समर्पणाच्या भावनेतून क्लबचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

या सोहळ्यात डॉ. सौ. संघमित्रा फुले, डॉ. स्नेहल अंधारे, डॉ. अमिता हिप्पळगावकर आणि प्रदीप साळुंखे यांचा नवीन सदस्य म्हणून रोटरी परिवारात समावेश करण्यात आला.

कार्यक्रमास विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी, रोटेरियन्स, त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच इनरव्हील क्लबच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande