
जळगाव, 30 जून (हिं.स.)। भारतातील शेती व्यवसायाला आधुनिकतेची जोड देण्यासाठी डीसीएम श्रीराम लिमिटेडच्या श्रीराम फार्म सोल्युशन्सने आपली अत्याधुनिक पीक संरक्षण, विशेष वनस्पती पोषण आणि संशोधनाधारित बियाणे उत्पादने बाजारात सादर केली आहेत.
हवामान बदलाला तोंड देण्यासाठी कंपनीने 'सेनकुशा' हे ३० मिनिटांत पावसाचा परिणाम सहन करणारे जपानी तंत्रज्ञानाचे कीटकनाशक, 'झारविन' हे पहिले पेटंटप्राप्त बुरशीनाशक, आणि मक्यासाठी 'एडेलॉन' तणनाशक लाँच केले आहे. जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी 'फर्मप्लस' आणि 'सिम्बिओ' या जैविक उत्पादनांसह, तूर उत्पादकांसाठी दोन विशेष संशोधनाधारित वाण उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
या क्रांतिकारी उपक्रमाबद्दल श्रीराम फार्म सोल्युशन्सचे कार्यकारी संचालक व व्यवसाय प्रमुख संजय छाब्रा म्हणाले, अत्याधुनिक बियाणे, पीक संरक्षण आणि पीक पोषण उपाय थेट शेतकऱ्यांच्या हातात देऊन आम्ही त्यांना केवळ अधिक चांगली पिके घेण्यासाठी नव्हे, तर अधिक उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी सक्षम करत आहोत. हा उपक्रम ग्रामीण भागात समृद्धी आणेल असा विश्वास व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर