नंदुरबार : तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी स्माइल योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती व बीज भांडवल योजना सुरू
नंदुरबार, 30 जून, (हिं.स.) | सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्या ‘सपोर्ट फॉर मार्जिनलाईज्ड इंडिव्हिज्युअल्स फॉर लाइव्हलीहुड अँड एंटरप्राइज (SMILE)’ या केंद्रीय क्षेत्र योजनेअंतर्गत तृतीयपंथीय व्यक्तींच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थ
नंदुरबार : तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणासाठी स्माइल योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती व बीज भांडवल योजना सुरू


नंदुरबार, 30 जून, (हिं.स.) | सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्या ‘सपोर्ट फॉर मार्जिनलाईज्ड इंडिव्हिज्युअल्स फॉर लाइव्हलीहुड अँड एंटरप्राइज (SMILE)’ या केंद्रीय क्षेत्र योजनेअंतर्गत तृतीयपंथीय व्यक्तींच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी शिष्यवृत्ती योजना तसेच स्वयंरोजगार व व्यवसायासाठी बीज भांडवल योजना राबविण्यात येत आहे.

या योजनांमुळे तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळणार असून स्वयंरोजगारासाठीही भक्कम आर्थिक पाठबळ उपलब्ध होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पात्र तृतीयपंथीय व्यक्तींनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण चे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.

तृतीयपंथीय समाजाला शिक्षण, रोजगार व उद्योजकतेच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्याबरोबरच स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे तृतीयपंथीय व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

शिष्यवृत्ती योजनेचा लाभ कोणाला?

या योजनेचा लाभ शासनमान्य अथवा खासगी शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये इयत्ता 9वी पासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत शिक्षण घेणाऱ्या तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना मिळणार आहे. लाभार्थी हा भारताचा नागरिक असणे आवश्यक असून सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या राष्ट्रीय पोर्टलवर जारी करण्यात आलेले तृतीयपंथीय ओळख प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. पात्र विद्यार्थ्यांनी

https://transgender.dosje.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करून ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तींची संख्या मर्यादित असल्यामुळे लाभार्थ्यांची निवड मागील शैक्षणिक वर्षातील गुणवत्तेच्या आधारे करण्यात येणार आहे. तसेच केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. विद्यार्थ्यांचे आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

प्रतिवर्षी 13,500 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती

या योजनेंतर्गत प्री-मॅट्रिक आणि पोस्ट-मॅट्रिक शिक्षण घेणाऱ्या तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 13,500 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या आर्थिक सहाय्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च भागविणे सोपे होणार असून उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.

स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना तृतीयपंथीय व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना उद्योग, व्यवसाय व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बीज भांडवल योजना राबविण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande