नाशिक - जीएसटी दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
नाशिक, 30 जून (हिं.स.)। जीएसटी प्रणाली लागून नऊ वर्षे झाल्याने आज जीएसटी दिन असल्याने विविध उपक्रम राबविले जातात . त्या निमित्ताने शहरात जनजागृती बरोबरच उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व पाच जिल्ह्यांतील दहा व्यावसायिकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

जिएसटी दिनाच्या औचित्याने सिडकोतील कार्यालयास रंगरंगोटी बरोबरच विद्युत रोषणाई करण्यात आली होती . तसेच नाशिकसह जळगाव , धुळे , नंदुरबार व नगर जिल्ह्यात उत्कृष्ट व्यवसाय करून नियमित कर भरणाऱ्या दहा व्यवसायिकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे . तर जनजागृतीसाठी जिएसटी कार्यालय ते गोल्फ क्लब पर्यंत सायकल रॅलीद्वारे संदेश देण्यात येणार असल्याचे आयुक्त हेमलता राय यांनी सांगितले .

याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना जिएसटी बाबत ज्ञान असावे यासाठी शहरातील शालेय विद्यार्थ्यांना जिएसटी भवन येथे माहिती दिली जाणार आहे . तर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी विविध स्पर्धा , अधिकाऱ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे . यानिमित्त उपायुक्त पी. के . जे . अय्यर यांनी लिहलेल व गायन केलेल आओ सुनो जीएसटी की नऊ साल की गाथा हे गाण ही गायल जाणार आहे .दुपारच्या सत्रात निमा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत व्यावसायिक व उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे . या आगळ्या वेगळ्या उपक्रमात नाशिकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिएसटी चे आयुक्त एस बी देशमुख ,अतिरिक्त आयुक्त अनुश्री हर्डीकर , संयुक्त आयुक्त शंतनु , यांनी केले आहे .

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV

 rajesh pande