ठाण्यातील काही भागात पाणी नाही
ठाणे, 30 जून (हिं.स.) - 29 अलनिनो व आयओडीच्या प्रभावामुळे समुद्र प्रवाह सक्रिय झाल्यामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. याबाबत जलसंपदा विभागा बरोबर दि. १९/०६/२०२६ रोजी झालेल्या आढावा बैठकीच्या निर्णयाप्रमाणे, आगामी कालावधीत पाणी टंचाईची परिस्थिती
ठाण्यातील काही भागात पाणी नाही


ठाणे, 30 जून (हिं.स.) - 29 अलनिनो व आयओडीच्या प्रभावामुळे समुद्र प्रवाह सक्रिय झाल्यामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. याबाबत जलसंपदा विभागा बरोबर दि. १९/०६/२०२६ रोजी झालेल्या आढावा बैठकीच्या निर्णयाप्रमाणे, आगामी कालावधीत पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवू नये म्हणुन पाणी कपात करण्याचे ठरले आहे. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा पाणी पुरवठा बुधवार, दि. ०१/०७/२०२६ रात्री १२.०० ते शुक्रवार, दि. ०३/०७/२०२६ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यत एकूण ४८ तास बंद राहील.

सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेअंतर्गत कळवा, मुंब्रा दिवा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरूनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, असे सांगण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande