
छत्रपती संभाजीनगर, 04 जून (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत.ते उमेदवारी माघारी घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
समीर सत्तार यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र, महायुतीत निर्माण झालेली बंडखोरी रोखण्यात अखेर यश आल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री आणि यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर अब्दुल सत्तार यांनी मुलाची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या मतदारसंघातील महायुतीतील अंतर्गत वादाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis