१३१ गोवंशांची सुटका केली म्हणून पोलीस आयुक्तांचा माजी आमदार संजय केनेकरांकडून सत्कार
छत्रपती संभाजीनगर, 04 जून (हिं.स.)। शहरात कत्तलीसाठी आणण्यात आलेल्या १३१ गोवंशांची सुटका करून १४ आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करणारे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांचा आमदार संजय केनेकर यांनी प्रत्यक्ष भेटून सत्कार केला. गोवंशांची सुटका कर
अ


छत्रपती संभाजीनगर, 04 जून (हिं.स.)। शहरात कत्तलीसाठी आणण्यात आलेल्या १३१ गोवंशांची सुटका करून १४ आरोपींविरोधात मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करणारे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांचा आमदार संजय केनेकर यांनी प्रत्यक्ष भेटून सत्कार केला. गोवंशांची सुटका करून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत समाजात सुरक्षितता, संवेदनशीलता आणि माणुसकीचा संदेश देणारी ही कारवाई असल्याचे केनेकर यांनी सांगितले. कर्तव्यनिष्ठ व जनहिताला प्राधान्य देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांमुळे नागरिकांचा कायद्यावरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी संपूर्ण पोलीस पथकाचे अभिनंदन करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande