अमरावती शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर
विनापरवानगी व मान्यतेच्या शिवाय सुरू होत्या शाळा अमरावती, 04 जून (हिं.स.) :राज्यभरात जिकडेतिकडे इंग्रजी शाळांचे पेव फुटले असून पालकांची धाव सध्या इंग्रजी शाळांकडेच दिसून येत आहे. मात्र यामधील काही शाळा विनापरवानगी चालू असल्याचे निष्पन्न लक्षात आल्
अमरावती शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर


विनापरवानगी व मान्यतेच्या शिवाय सुरू होत्या शाळा अमरावती, 04 जून (हिं.स.) :राज्यभरात जिकडेतिकडे इंग्रजी शाळांचे पेव फुटले असून पालकांची धाव सध्या इंग्रजी शाळांकडेच दिसून येत आहे. मात्र यामधील काही शाळा विनापरवानगी चालू असल्याचे निष्पन्न लक्षात आल्यानंतर अमरावती महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे शहरातील अशा शाळांची तपासणी करण्यात आली. तपासणी वेळी काही शाळा विनापरवानगी व मान्यतेच्या शिवाय सुरू असल्याचे लक्षात आले आहे.

यामध्ये वलगाव रोड येथील फाल्कन इंग्लिश स्कूल , पुंडलिक बाबा नगर येथील विजार्ड इंग्लिश स्कूल व जमीन कॉलनी मधील गोल्डन स्टार इंग्लिश स्कूल या शाळा अनाधिकृत असल्याचे महानगरपालिका शिक्षण विभाग अमरावती यांच्यावतीने जाहीर करण्यात आलेले आहे. तसेच पालकांनी सदर शाळेमध्ये प्रवेश घेतल्यास भविष्यात पाल्याच्या शैक्षणिक नुकसानीस पालक स्वतः जबाबदार राहतील अशी भूमिका शिक्षण विभागांच्या वतीने जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच शहरातील शाळांमध्ये प्रवेश घेतेवेळी पालकांनी शाळा संबंधीत सर्व माहिती, कागदपत्रे याबाबतची तपासणी करूनच प्रवेश घेण्याबाबत निर्णय घ्यावा असे आवाहन सुद्धा यावेळेस शिक्षण विभाग महानगरपालिका यांच्यातर्फे करण्यात आले आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande