
नांदेड, 04 जून (हिं.स.)।
जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या संजय निलपत्रेवार यांची परभणी जिल्ह्यात बदली झाली असून त्यांनी माळाकोळी, उस्माननगर, वजिराबाद पोलिस ठाण्यात कामगिरी केली आहे..
पोलीस स्टेशन परीसरातील पोलीस भरती स्पर्धा परीक्षा करणाऱ्या युवकाना सुसज असे सुरक्षित स्वप्नाचे मैदान आणि अभ्यासिका तयार करून दिली तरुणांना शहरात जाण्याच वेळ आणि अर्थीक खर्च वाचवला मुलांच्या मेहनतीला वाट मिळाली अपघाताची भीती टळली. पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अश्विनी जगताप मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली ऑपरेशन क्रॅक डाऊन, ऑपरेशन फ्लॅश आउट, ऑपरेशन मुस्कान, अंतर्गत गुन्हेगारीला आळा घालण्यात यश आले आहे.
नाशिक, कोल्हापुर, सातारा तसेच तेलंगना, कर्नाटक, गोवा परराज्यात जाऊन पोलीस स्टेशन हद्दीतील पळवून नेलेले व हरवलेले (मिसींग) 34 स्त्री पुरुष शोधण्यात पोलीसाना यश आलेले आहे.
ऑपरेशन फ्लॅशआऊट, ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत दारू विक्रेते, जुगार व शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध असे एकुण 95 गुन्हे दाखल करून 135 आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल करून 7 लाख 90 लाख 500 रुपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध रेती वाहतूक व उत्खनना विरुद्ध एकुण 32 गुन्हे दाखल करून 102 आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल करून 23 कोटी 83 लाख 82 हजार 900 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रेती माफिया विरुद्ध संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत, तडीपार इत्यादी सारखे कठोर पावले उचलुन अवैदय धंद्यावर
लगाम लावण्यात उस्माननगर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांचे टीमला यश आले आहे. तसेच काही गावांमध्ये दारूबंदी करण्यात यश आले आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यांमध्ये इंदापुर, दौंड पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तलय, चाकण पोलीस स्टेशन, क्राईम ब्रैनच युनिट 2, नांदेड जिल्हा येथे वजीराबाद, कुंटुर, माळाकोळी, उस्माननगर पोलिस स्टेशन,
वजीराबाद येथे कार्यरत आसताना अंतरराष्ट्रीय गुन्हेगार भारत सरकारने दहशतवादी संघटना बबर खालसा शी संबंधित असलेला हरविदरसिंग रिंदा याच्या वडीलावर गुन्हा दाखल करून जेल मध्ये पाठवले व एकुण 9 रिव्हालवर जप्त करण्यात आले आसून बऱ्याच आरोपी विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. माळाकोळी येथील मौजे मोहिजा परंडा येथील 9 वर्षाच्या मुलीचे अपहरणाचा संवेदनशील गुन्हा उघड करून आरोपीला जेरबंद करण्यात आले
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis