
नांदेड, 04 जून (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्ह्यातील आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी
मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान, आगामी नांदेड विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा केली. तसेच, माझ्या लोहा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामांच्या संदर्भात वहिनींना निवेदन देऊन, सदर कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याबाबत आग्रही विनंती केली.
विकासाच्या या प्रवासात त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, मतदारसंघाच्या प्रगतीसाठी त्या नेहमीच सहकार्य करत आहेत.
यावेळी माजी आमदार मोहनराव हंबर्डे, माजी आमदार अविनाशराव घाटे आणि
माजी आमदार सुभाषराव साबणे उपस्थित होते.
.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis