जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचा संदेश; पर्यावरण संरक्षणाचा संकल्प दृढ करण्याचे आवाहन
नवी दिल्ली , 05 जून (हिं.स.)।जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा देत पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचे कौतुक केले. पर्यावरणाचे संरक्षण आणि शाश्वत विकासासाठीची आपली बांधिलकी अधिक दृ
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचा संदेश; पर्यावरण संरक्षणाचा संकल्प दृढ करण्याचे आवाहन


नवी दिल्ली , 05 जून (हिं.स.)।जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा देत पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचे कौतुक केले. पर्यावरणाचे संरक्षण आणि शाश्वत विकासासाठीची आपली बांधिलकी अधिक दृढ करण्याची ही संधी असल्याचे त्यांनी म्हटले.

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, “जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पर्यावरण संवर्धनासाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या सर्वांचे मी अभिनंदन करतो.” ते पुढे म्हणाले की, हा दिवस आपल्याला पर्यावरणाचे रक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आपल्या संकल्पाची पुनर्पुष्टी करण्याची आठवण करून देतो.

गेल्या दशकात केंद्र सरकारने पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात उचललेल्या विविध पावलांचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहेत. भारताच्या महत्त्वाच्या यशांमध्ये हरित क्षेत्रात झालेली वाढ आणि अनेक वन्यजीव प्रजातींच्या संख्येत झालेली लक्षणीय वाढ यांचा समावेश आहे.

मोदी यांनी देशातील नागरिकांचेही कौतुक केले. ते म्हणाले की, सामूहिक प्रयत्न, प्रभावी धोरणे, विज्ञानावरील विश्वास आणि नवोन्मेष यांच्या बळावर पर्यावरण संरक्षणाला नवी दिशा देता येते, हे भारतीयांनी सिद्ध करून दाखवले आहे. सरकार आणि जनतेच्या संयुक्त सहभागामुळे पर्यावरण क्षेत्रात अनेक उल्लेखनीय यश मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.

जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी ५ जून रोजी साजरा केला जातो. पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणे आणि नागरिकांना या दिशेने ठोस पावले उचलण्यासाठी प्रेरित करणे हा या दिवसाचा प्रमुख उद्देश आहे.

संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (यूएनईपी) यांनी १९७३ मध्ये या उपक्रमाची सुरुवात केली. आज हा दिवस पर्यावरणाशी संबंधित प्रश्नांवर जनजागृती निर्माण करणारे जगातील सर्वात मोठे व्यासपीठ बनले आहे.दरवर्षी कोट्यवधी लोक या अभियानात सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनासाठी आपला हातभार लावतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande