व्यावसायिक एलपीजी सिलिंडर १८३.५० रुपयांपर्यंत स्वस्त
नवी दिल्ली, 01 जुलै (हिं.स.)। जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी देशातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. या कपातीनंतर आजपासून देशातील विविध राज्यांमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर १
Commercial LPG Gas Cylinder Price Cut


नवी दिल्ली, 01 जुलै (हिं.स.)। जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी देशातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी १९ किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. या कपातीनंतर आजपासून देशातील विविध राज्यांमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर १७४ ते १८३.५० रुपयांपर्यंत स्वस्त झाला आहे. सर्वाधिक १८३.५० रुपयांची कपात दिल्लीत करण्यात आली असून, सर्वात कमी १७४ रुपयांची कपात कोलकात्यात करण्यात आली आहे.

व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त झाल्यामुळे रेस्टॉरंट, ढाबे आणि केटरिंग सेवा चालविणाऱ्या व्यावसायिक ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. मात्र, ही दरकपात केवळ व्यावसायिक श्रेणीतील १९ किलोच्या सिलिंडरसाठीच करण्यात आली असून, घरगुती वापरातील १४.२ किलोच्या एलपीजी (स्वयंपाक गॅस) सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

ऑइल मार्केटिंग कंपन्यांच्या माहितीनुसार, दरकपातीनंतर दिल्लीत व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर १८३.५० रुपयांनी स्वस्त होऊन ३,११३.५० रुपयांऐवजी २,९३० रुपयांना उपलब्ध झाला आहे. त्याचप्रमाणे मुंबईत सिलिंडर १८२ रुपयांनी स्वस्त होऊन त्याची किंमत २,८८५.५० रुपये झाली आहे. कोलकात्यात १७४ रुपयांची कपात करण्यात आली असून, तेथे १९ किलोचा एलपीजी गॅस सिलिंडर आता ३,०८१.५० रुपयांना मिळणार आहे.

याशिवाय, चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर १७७ रुपयांनी स्वस्त होऊन त्याची किंमत ३,१०६ रुपये झाली आहे. दिल्लीलगतच्या एनसीआर भागात नोएडामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर १८३.५० रुपयांनी स्वस्त होऊन २,९३० रुपयांना उपलब्ध झाला आहे, तर गुरुग्राममध्ये १९ किलोचा एलपीजी गॅस सिलिंडर १८२.५० रुपयांनी स्वस्त होऊन २,९४७.५० रुपयांना मिळत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande