नांदेडमध्ये 6 जुलै रोजी लोकशाही दिनाचे आयोजन
नांदेड, 1 जुलै (हिं.स.) : सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, अडचणी आणि समस्या न्याय्य व तत्परतेने सोडविण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, 6 जुलै 2026 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे लो
नांदेडमध्ये 6 जुलै रोजी लोकशाही दिनाचे आयोजन


नांदेड, 1 जुलै (हिं.स.) : सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, अडचणी आणि समस्या न्याय्य व तत्परतेने सोडविण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, 6 जुलै 2026 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकशाही दिनात महसूल, गृह, जिल्हा परिषद, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, सहकार, कृषी, पाणीपुरवठा समन्वय अधिकारी आदी विविध विभागांचे जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच, ज्या विभागांची लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणे आहेत, त्या विभागांचे अधिकारीही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे उपस्थित राहतील.

या दिवशी सकाळी 12 वाजल्यापासून नागरिकांच्या निवेदनांची नोंदणी सुरू करण्यात येईल. त्यानंतर प्राप्त अर्ज व निवेदनांवरील संबंधितांची मते ऐकून त्यावरील कार्यवाहीला तातडीने सुरुवात केली जाईल.

लोकशाही दिनात प्राप्त होणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी व अडचणींचा एकत्रित आढावा घेऊन त्या शक्य तितक्या लवकर निकाली काढण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी दिली.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande