मेघना बोर्डीकर यांच्या पुढाकारातून परभणीच्या शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेची संधी
परभणी, 01 जुलै (हिं.स.)। मेघना बोर्डीकर यांच्या पुढाकारातून परभणीच्या शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेची संधी उपलब्ध असल्याची माहिती युवा नेते ध्रुव साकोरे यांनी दिली आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भाजीपाला व फळपिकांना योग्य भाव आणि विश्वासार्ह बा
अ


परभणी, 01 जुलै (हिं.स.)।

मेघना बोर्डीकर यांच्या पुढाकारातून परभणीच्या शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेची संधी उपलब्ध असल्याची माहिती युवा नेते ध्रुव साकोरे यांनी दिली आहे.

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भाजीपाला व फळपिकांना योग्य भाव आणि विश्वासार्ह बाजारपेठ मिळावी, यासाठी आ. मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मागील ८ महिन्यांपासून सातत्याने यावर काम करत होतो.

या प्रयत्नांना अखेर यश मिळत असून Prime Fresh Private Limited च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला शेतीमाल थेट कंपनीला विक्री करण्याची संधी उपलब्ध होत आहे. यामुळे मध्यस्थांची संख्या कमी होऊन शेतकऱ्यांना योग्य व खात्रीशीर मोबदला मिळण्यास मदत होणार आहे.

पडद्यामागे सातत्याने केलेल्या प्रयत्नांतून शेतकरीहिताचा हा महत्त्वाचा उपक्रम प्रत्यक्षात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande