व्हेनेझुएलामधील भूकंपग्रस्तांसाठी भारताचे मदतकार्य वेगात; मंत्र्यांकडून पंतप्रधान मोदींचे आभार
नवी दिल्ली , 01 जुलै (हिं.स.)।वेनेझुएलामध्ये भारताने ‘ऑपरेशन अमिस्ताद’ अंतर्गत पाठवलेल्या मदतीमुळे भूकंपग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. भीषण भूकंपानंतर मदत आणि बचाव कार्यात भारतीय वैद्यकीय पथकाने बजावलेल्या भूमिकेचे वेनेझुएलाच्या मंत्र्यांनी कौत
व्हेनेझुएलामधील भूकंपग्रस्तांसाठी भारताचे मदतकार्य वेगात; मंत्र्यांकडून पंतप्रधान मोदींचे आभार


नवी दिल्ली , 01 जुलै (हिं.स.)।वेनेझुएलामध्ये भारताने ‘ऑपरेशन अमिस्ताद’ अंतर्गत पाठवलेल्या मदतीमुळे भूकंपग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. भीषण भूकंपानंतर मदत आणि बचाव कार्यात भारतीय वैद्यकीय पथकाने बजावलेल्या भूमिकेचे वेनेझुएलाच्या मंत्र्यांनी कौतुक केले आहे. या भूकंपात आतापर्यंत १,७०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

भूकंपग्रस्तांना उपचार आणि मानवीय मदत पुरविण्याचे भारताचे प्रयत्न आणखी वेगाने सुरू आहेत. वेनेझुएलातील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, मानवशक्ती व परराष्ट्र व्यवहार मंत्री अँड्रिया कोराओ फारिया यांनी भारतीय फील्ड हॉस्पिटलला भेट देऊन भूकंपग्रस्तांसाठी सुरू असलेल्या मदतकार्याचे कौतुक केले. संकटाच्या काळात भारताने दाखवलेली तत्परता आणि सक्रियता खरोखरच प्रशंसनीय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही त्यांनी आभार मानले.

भारतीय वायुसेनेने सांगितले की, ‘ऑपरेशन अमिस्ताद’ अंतर्गत वेनेझुएलामध्ये भारतीय सैन्याचे फील्ड हॉस्पिटल, ३५ टनांहून अधिक मदतसामग्री, औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि दोन ‘भीष्म क्यूब’ पाठविण्यात आले आहेत. याशिवाय भारतीय पथके शोध आणि बचाव मोहिमाही अत्यंत परिश्रमपूर्वक राबवत आहेत.

दरम्यान, वेनेझुएलामध्ये भूकंपाचे धक्के अद्यापही सुरूच आहेत. २४ जून रोजी झालेल्या दुहेरी भूकंपानंतर आतापर्यंत ६०० हून अधिक आफ्टरशॉक्सची नोंद झाली आहे. २९ जून रोजीही वेनेझुएलाच्या कॅरिबियन किनारपट्टीवर, काराबाल्लेडा शहरापासून सुमारे २७ किलोमीटर उत्तरेस रिश्टर स्केलवर ४.६ तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला. अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या (USGS) माहितीनुसार, या भूकंपाचे धक्के उत्तर वेनेझुएलातील आपत्तीग्रस्त ला गुईरा राज्यातही तीव्रतेने जाणवले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande