
नाशिक, 17 जुलै (हिं.स.)।
- पावसाने ओढ दिल्यानंतर आता पालेभाज्यांचे भाव गगनाला भिडत असून नाशिक मध्ये झालेल्या बाजार समितीचे लिलावामध्ये कोथिंबिरीची एक जुडी 285 रुपयाला विकली गेली आहे त्यामुळे आता जेवणातून कोथिंबीर हद्दपार झाली आहे.
यावर्षी अलनिनोच्या प्रभावामुळे पाऊस असाही कमी होणार आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे जून महिना हा पूर्णपणे कोरडा केला तर लय महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आत्तापर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये 356.6 मिलिमीटर एवढा पावसाची नोंद झालेली आहे तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेला पाऊस हा 113.6 मिलिमीटर एवढा नोंदविण्यात आला आहे जिल्ह्यामध्ये मागील दिड महिन्यांमध्ये म्हणजे 17 जुलै पर्यंत 94.5 टक्के पावसाची नोंद झालेली आहे.
जिल्ह्यामध्ये पावसाने ओढ दिली तसेच काही प्रमाणामध्ये जो पाऊस झाला त्याच्यामध्ये शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले म्हणूनच भाजीपाल्यांची आवकही घटली आहे आवक घातल्यामुळे नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील चार दिवसापासून म्हणजे 14 जुलै रोजी दोनशे रुपये 15 जुलै रोजी 248 रुपये असं सातत्याने भाव वाढणारी कोथिंबीरीची जुडी ही बाजार समितीमध्ये झालेल्या भाजीपाल्याच्या लिलावामध्ये 285 रुपये उच्चांकी दर एका जोडीला भाव मिळालेला आहे सर्वसाधारण 70 रुपयांपासून 285 रुपये पर्यंत कोथिंबिरीचा भाव बाजार समितीमध्ये मिळाला आहे. आतापर्यंत बाजार समितीच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त दर कोथिंबिरीला मिळाला असल्याची माहिती बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून देण्यात आली असून ग्राहकांना कोथिंबीर खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार असल्यामुळे आता जेवणाच्या ताटातून कोथिंबीर हद्दपार होण्याच्या मार्गावरती आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV