पाकिस्तानी लष्करी ताफ्यावरील भीषण हल्ल्यात ४५ हून अधिक जवान ठार झाल्याचा बीएलएचा दावा
इस्लामाबाद, 17 जुलै (हिं.स.)।बलुचिस्तानमधील मस्तुंग जिल्ह्यात पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर लक्ष्य साधून हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने स्वीकारली असून, या कारवाईत ४५ हून अधिक सुरक्षा
पाकिस्तानी लष्करी ताफ्यावरील भीषण हल्ल्यात ४५ हून अधिक जवान ठार असल्याचा बीएलएचा दावा


इस्लामाबाद, 17 जुलै (हिं.स.)।बलुचिस्तानमधील मस्तुंग जिल्ह्यात पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर लक्ष्य साधून हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्याची जबाबदारी बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने स्वीकारली असून, या कारवाईत ४५ हून अधिक सुरक्षा जवान ठार झाल्याचा दावा केला आहे. तसेच, अनेकजण जखमी झाल्याचेही सांगण्यात आले आहे.

एका निवेदनात बीएलएचे प्रवक्ते जियंद बलोच यांनी सांगितले की, हा हल्ला गुरुवारी मस्तुंग जिल्ह्यातील खडकुचा परिसरात संघटनेच्या ‘फतह स्क्वाड’ या विशेष युनिटने केला. त्यांनी या कारवाईचे वर्णन समन्वित आणि अत्यंत तीव्र हल्ला असे केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे जवान, त्यांचे सुरक्षा कर्मचारी आणि नंतर घटनास्थळी पोहोचलेल्या लष्करी मदतपथकांना घेऊन जाणाऱ्या बसांच्या ताफ्यालाही लक्ष्य करण्यात आले.

बीएलएच्या निवेदनात म्हटले आहे की, “आतापर्यंत प्राप्त झालेल्या अहवालांनुसार, या कारवाईत पाकिस्तानी लष्कराचे ४५ हून अधिक जवान ठार झाले असून डझनभर जण जखमी झाले आहेत. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, मृत आणि जखमींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.” दरम्यान, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी ताफ्यावर हल्ला झाल्याची बाब मान्य केल्याचे वृत्त आहे, मात्र त्यांनी मृत किंवा जखमींच्या संख्येबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

स्थानिक सूत्रांच्या हवाल्याने बलुचिस्तान पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी मस्तुंगच्या खडकुचा भागात पाकिस्तानी लष्कराच्या कथित गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला, तर चार लहान मुलांसह ११ जण जखमी झाले.

लष्करी ताफ्यावर झालेल्या या हल्ल्यानंतर प्रदेशात तणाव वाढला आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला बलुचिस्तानातील ग्वादर जिल्ह्यातील जिवानी भागात पाकिस्तान कोस्ट गार्डच्या छावणीवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारीही बीएलएने स्वीकारली होती. त्या हल्ल्यात ३० हून अधिक सुरक्षा कर्मचारी ठार झाले आणि अनेकजण जखमी झाल्याचा दावा करण्यात आला होता.

बीएलएचे प्रवक्ते जियंद बलोच यांनी एका निवेदनात म्हटले होते की, हा हल्ला जिवानीतील पनवान परिसरात झाला. संघटनेच्या ‘मजीद ब्रिगेड’मधील एका सदस्याने स्फोटकांनी भरलेले माजदा वाहन पाकिस्तान कोस्ट गार्डच्या छावणीत घुसवून त्याचा स्फोट घडवून आणला. निवेदनात पुढे म्हटले आहे की, “या भीषण स्फोटामुळे कोस्ट गार्डची किल्लेबंद छावणी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि ती अवशेषांच्या ढिगाऱ्यात परिवर्तित झाली.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande