सलग नवव्या दिवशी अमेरिकेचे इराणवर हवाई हल्ले; इराणचा सहयोगी देशांवर प्रतिहल्ला
वॉशिंग्टन , 20 जुलै (हिं.स.)। अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांड (सेंटकॉम) ने सोमवारी पहाटे इराणवर सलग नवव्या दिवशी हवाई हल्ले केले. शनिवारी इराकमध्ये पाडण्यात आलेल्या एका इराणी ड्रोनचा नाश करताना आणखी एका अमेरिकन सैनिकाचा मृत्यू झाल्याची पुष्टी अमे
सलग नवव्या दिवशी अमेरिकेचे इराणवर हवाई हल्ले; इराणचा सहयोगी देशांवर प्रतिहल्ला


वॉशिंग्टन , 20 जुलै (हिं.स.)। अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांड (सेंटकॉम) ने सोमवारी पहाटे इराणवर सलग नवव्या दिवशी हवाई हल्ले केले. शनिवारी इराकमध्ये पाडण्यात आलेल्या एका इराणी ड्रोनचा नाश करताना आणखी एका अमेरिकन सैनिकाचा मृत्यू झाल्याची पुष्टी अमेरिकेने केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या संघर्षात आतापर्यंत १७ अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

सेंट्रल कमांडने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या नागरी आणि व्यापारी जहाजांवर हल्ले करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इराणच्या लष्करी क्षमतांचा नाश करण्यासाठी हे हल्ले सुरू राहतील. इराणच्या अणुऊर्जा संस्थेने दावा केला आहे की अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये देशाच्या नैऋत्य भागातील बांधकामाधीन ‘दारखोविन’ अणुऊर्जा प्रकल्पाला लक्ष्य करण्यात आले. उपग्रह चित्रांनुसार या ठिकाणी अद्याप प्राथमिक स्तरावरील काम सुरू होते. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) देखील स्पष्ट केले आहे की त्यांच्या अलीकडील पाहणीपर्यंत या बांधकामस्थळी कोणतीही अणुसामग्री नव्हती.

दरम्यान, अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या सहयोगी देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. जॉर्डनच्या सैन्याने सोमवारी अनेक इराणी क्षेपणास्त्रे हवेतच पाडून निष्प्रभ केली. या हल्ल्याच्या निषेधार्थ जॉर्डनने इराणच्या राजदूताला समन्स बजावले आहे.जॉर्डनमधील अकाबा शहरावर डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांनंतर शेजारील इस्रायलनेही सतर्कतेचा इशारा दिला आहे. क्षेपणास्त्रांचा मलबा इस्रायली हद्दीत पडण्याची शक्यता असल्याने अनेक आठवड्यांनंतर प्रथमच हवाई हल्ल्याचे सायरन वाजवावे लागू शकतात, असा इशारा इस्रायली सैन्याने दिला आहे.

कुवेतमधील वीज आणि समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणाऱ्या (डिसॅलिनेशन) प्रकल्पावर दोन दिवसांत दुसऱ्यांदा हल्ला झाला असून त्यामुळे तेथे आग लागली आहे. कुवेत आपल्या पिण्याच्या पाण्याच्या सुमारे ९० टक्के गरजांसाठी अशा प्रकल्पांवर अवलंबून आहे.

आखाती सहकार्य परिषद (GCC) चे महासचिव जसीम मोहम्मद अल-बुदैवी यांनी नागरी पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवांवरील हल्ल्यांसाठी इराणवर “युद्धगुन्हा” केल्याचा आरोप केला आहे. आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यानुसार पूल, वीज प्रकल्प आणि इतर नागरी ठिकाणांवर हल्ले करणे प्रतिबंधित आहे, जोपर्यंत त्यांचा वापर लष्करी उद्देशांसाठी केला जात नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande