सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा मुद्दा संसद अधिवेशनात मांडू - सुप्रिया सुळे
नवी दिल्ली, 17 जुलै (हिं.स.) - दिल्लीत जंतरमंतर मैदानात सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आंदोलनाला भेट दिली. वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा मुद्दा संसद अधिवेशनात मांडू - सुप्रिया सुळे


नवी दिल्ली, 17 जुलै (हिं.स.) - दिल्लीत जंतरमंतर मैदानात सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आंदोलनाला भेट दिली. वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्या मैदानावर गेल्या. तिथे त्यांनी सोनम वांगचुक यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी तरुणांना संबोधित केलं. सोनम वांगचुक यांची विचारपूस केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा मुद्दा आपण संसद अधिवेशनात मांडू, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

राज्यात आंदोलन चाललं असेल तर ती आमची नैतिक जबाबदारी आहे की, समाजात ज्या गोष्टी सुरु आहेत त्या सरकार दरबारी पोहोचवल्या पाहिजेत. समाजातील पालकांमध्ये, तरुण पिढीत एक भावना आहे, इथे आंदोलन सुरु आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी आंदोलन चालू आहे. आम्ही जे लोकप्रतिनिधी आहोत, आमची नैतिक जबाबदारी असते की, समाजात ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या संसदेत मांडल्याच पाहिजेत. संसद सुरु होण्याआधी दोन ठिकाणी मी या विषयावर बोलणार आहे. एकतर रविवारी सकाळी सर्वपक्षीय बैठकीत बोलणार आहे. केंद्र सरकारने ही रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत मी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय, भारतात कमी झालेला पाऊस, त्याचबरोबर शिक्षणात झालेला सावळा गोंधळ, राम मंदिरचे जे व्हिडीओज येत आहेत, असे अनेक गंभीर विषय देशासमोर आहेत. सर्वपक्षीय बैठकीत हे सर्व विषय आम्ही महाविकास आघाडी आणि इंडी आघाडीसोबत बोलून मांडणार आहोत, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande