दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांना आमच्या संघटनेत पूर्णविराम - सुप्रिया सुळे
नवी दिल्ली, १७ जुलै (हिं.स.) : माझा भाऊ आज राहिला नाही. त्यामुळे माझ्या भावाबद्दल आणि झालेल्या चर्चेला आता पूर्णविराम दिला आहे. माझा भाऊ जाऊन पाच महिने झाले आहेत. आम्ही कुटुंब म्हणून कुठेतरी सावरतोय. माझ्या भावाची जी शेवटची इच्छा होती की, दोन्ही पक
दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चांना आमच्या संघटनेत पूर्णविराम - सुप्रिया सुळे


नवी दिल्ली, १७ जुलै (हिं.स.) : माझा भाऊ आज राहिला नाही. त्यामुळे माझ्या भावाबद्दल आणि झालेल्या चर्चेला आता पूर्णविराम दिला आहे. माझा भाऊ जाऊन पाच महिने झाले आहेत. आम्ही कुटुंब म्हणून कुठेतरी सावरतोय. माझ्या भावाची जी शेवटची इच्छा होती की, दोन्ही पक्ष एकत्र येवून गुण्यागोविंदाने सर्वांनी राज्याची आणि देशाची सेवा करावी. माझ्या भावाची इच्छा पूर्ण करण्याची इच्छा अजितदादा असतानाही होती आणि अजित दादा गेल्यावरही होती. पण आता तशी काही भावना त्या बाजूने येत नाही. त्यामुळे माझ्या मनात आणि आमच्या संघटनेत त्या गोष्टीला आम्ही पूर्णविराम दिला, अशी स्पष्ट प्रतिक्रिया राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. दिल्लीत जंतर-मंतरवर सोनम वांगचूक यांची भेट घेण्यासाठी त्या गेल्या होत्या. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विलीनीकरणाबाबत भाष्य केलं.

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा सध्या सुरु आहे. विलीनीकरणाच्या चर्चेला आधी नकार देणाऱ्या अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरेंनी यु टर्न घेत दिवंगत अजित पवार हयात असताना या चर्चा झाल्याचं आता मान्य केलं आहे. याविषयी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिल्याचं त्यांनी सांगितलं. त्या नेमकं काय म्हणाल्या जाणून घेऊया.

त्यांनी पुढे सांगितलं की, जेव्हा आमच्यातील नेते गेले आणि समोरच्याने सांगितलं की अशी घटना झालीच नाही, तेव्हा आम्हाला प्रचंड दु:ख झालं आणि वेदना झाल्या. एकतर माझा भाऊ गेला होता आणि माझ्या भावाची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आमचे सगळे प्रयत्न होते. कारण तो प्रस्ताव माझ्या भावाचा होता. त्यामुळे आमच्याकडून तो विषय आम्ही त्या दिवशीच संपवला. आम्ही स्वाभिमानी लोक आहोत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, ज्यादिवशी माझा भाऊ गेला आणि समोरच्यांच्या स्टेटमेंटवरुन माझ्या लक्षात आलं की दादांची इच्छा पूर्ण करण्यात रस नाही. तेव्हा मी पूर्णविराम दिला आणि त्यानंतर आम्ही राज्याच्या आणि देशाच्या सेवेला लागलो आहोत.

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande