नीट पेपरफुटी प्रकरणावर उद्धव ठाकरे आक्रमक; प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
नागपूर,18 जुलै (हिं.स.) : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. नागपुरात बोलताना त्यांनी परीक्षा व्यवस्
उद्धव ठाकरे


नागपूर,18 जुलै (हिं.स.) : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. नागपुरात बोलताना त्यांनी परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप केला.

नागपूरच्या रामनगर येथील राम मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या रामरक्षा पठण' आंदोलनासाठी उद्धव ठाकरे 18 जुलै रोजी नागपुरात दाखल झाले. नागपूर विमानतळावर बोलताना त्यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट परीक्षा घोटाळ्याविरोधात उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केल्याच्या कारवाईवर आक्षेप घेतला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर सरकारने संवाद साधण्याऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप त्यांनी केला.

परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी तातडीने सुधारणा करण्याची गरज असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने संवेदनशीलतेने भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेल्या असंतोषाची दखल घेऊन सरकारने लवकर निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले.

----------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande