भारतीय वायू दल ऑस्ट्रेलियातील डार्विन येथे होणाऱ्या पिच ब्लॅक सरावात होणार सहभागी
नवी दिल्ली, 19 जुलै, (हिं.स.)। भारतीय वायू दल, सोमवारी रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्सच्या (आरएएएफ) डार्विन तळावर होणाऱ्या ''एक्सरसाइज पिच ब्लॅक 2026'' या सरावात सहभागी होत आहे. 20 जुलै ते 07 ऑगस्ट 2026 दरम्यान आयोजित, ''एक्सरसाइज पिच ब्लॅक'' हा आ
Indian Air Force Participate Exercise Pitch Black 2026 Darwin Australia


Indian Air Force Participate Exercise Pitch Black 2026 Darwin Australia


नवी दिल्ली, 19 जुलै, (हिं.स.)। भारतीय वायू दल, सोमवारी रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्सच्या (आरएएएफ) डार्विन तळावर होणाऱ्या 'एक्सरसाइज पिच ब्लॅक 2026' या सरावात सहभागी होत आहे. 20 जुलै ते 07 ऑगस्ट 2026 दरम्यान आयोजित, 'एक्सरसाइज पिच ब्लॅक' हा आरएएएफ चा प्रमुख द्विवार्षिक बहुराष्ट्रीय हवाई लढाऊ सराव आहे. या सरावाला पिच ब्लॅक हे नाव उत्तर ऑस्ट्रेलियाच्या विस्तीर्ण, निर्जन भागांवरून रात्रीच्या वेळी उड्डाण करण्यावर भर दिल्यामुळे मिळाले आहे. या सरावाच्या 45 वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासात, या आवृत्तीत सर्वाधिक संख्येने विविध देशांच्या सैन्यदलांचा सहभाग असून मोठ्या प्रमाणावर संयुक्त हवाई सराव मोहीम आणि बहुराष्ट्रीय युद्धसराव केला जाणार आहे.

भारतीय वायू दलाच्या तुकडीमध्ये वैमानिक, अभियंते, तंत्रज्ञ, नियंत्रक आणि इतर विषयातील तज्ञांसह अत्यंत कुशल वायू योद्ध्यांचा समावेश आहे. ही तुकडी राफेल बहुउद्देशीय लढाऊ विमान चालवेल. या विमानाला लढाऊ साहाय्याच्या भूमिकेत सी-17 ग्लोबमास्टर-III आणि आयएल-78 या हवेतल्या हवेत इंधन भरणाऱ्या विमानांचे साहाय्य लाभेल. हा सराव सहभागी दलांना आंतरकार्यक्षमता वाढवण्यासाठी, दलांचे एकत्रीकरण मजबूत करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर एकत्रितपणे कारवाया करण्याच्या दिशेने सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण करण्यासाठी एक मौल्यवान संधी प्रदान करेल. भारतीय हवाई दलाच्या तुकडीमध्ये वैमानिक, अभियंते, तंत्रज्ञ, नियंत्रक आणि इतर विषय तज्ञांसह अत्यंत कुशल हवाई योद्ध्यांचा समावेश आहे.

'पिच ब्लॅक 26' हा सराव लांब पल्ल्यांच्या मोहिमांसाठी आवश्यक असलेल्या अभियानात्मक हवाई कारवायांची पडताळणी करण्यासाठी, बहुराष्ट्रीय आंतरकार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि हिंद-प्रशांत क्षेत्रात व्यावसायिक भागीदारी मजबूत करण्यासाठी एक उत्कृष्ट संधी प्रदान करतो. हा सराव सहभागी वायू दलांना एका वास्तववादी आणि आव्हानात्मक बहुराष्ट्रीय वातावरणात कार्य करण्यास सक्षम करेल. त्यामुळे अधिक कार्यात्मक समन्वय आणि परस्पर सामंजस्य वाढेल. भारतीय वायू दलाने यापूर्वी या सरावाच्या 2018, 2022 आणि 2024 च्या आवृत्त्यांमध्ये भाग घेतला असून, संरक्षण सहकार्य आणि प्रादेशिक सुरक्षा मजबूत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande