सफदरजंग रुग्णालयावर विश्वास नाही, वांगचुक यांच्या पत्नीची दिल्ली उच्च न्यायालयात धाव
नवी दिल्ली , 19 जुलै (हिं.स.)।पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी सफदरजंग रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी सांगितले की, सफदरजंग या सरकारी रुग्णालयावरील त्यांचा विश्वास उडाला आहे. तसेच
सफदरजंग रुग्णालयावर विश्वास नाही, वांगचुक यांच्या पत्नीची दिल्ली उच्च न्यायालयात धाव


नवी दिल्ली , 19 जुलै (हिं.स.)।पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी सफदरजंग रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी सांगितले की, सफदरजंग या सरकारी रुग्णालयावरील त्यांचा विश्वास उडाला आहे. तसेच, या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करत त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

गीतांजली यांनी दावा केला की, रुग्णालयाने त्यांना सोनम वांगचुक यांच्या रक्तातील पोटॅशियमची पातळी २.९ पर्यंत घसरल्याचे सांगितले होते आणि ही स्थिती चिंताजनक तसेच जीवघेणी असल्याचे नमूद केले होते. मात्र, रुग्णालयाने प्रसिद्ध केलेल्या सार्वजनिक आरोग्य बुलेटिनमध्ये पोटॅशियमची नेमकी पातळी जाहीर करण्यात आली नाही; फक्त ती कमी होत असल्याचे सांगण्यात आले. त्यांनी पुढे असा दावा केला की, एका स्वतंत्र प्रयोगशाळेच्या तपासणीत पोटॅशियमची पातळी ३.५ आढळली, जी सामान्य मर्यादेत मानली जाते.

गीतांजली यांनी आरोप केला की, वारंवार विनंती करूनही रुग्णालय प्रशासन सोनम वांगचुक यांना डिस्चार्ज देण्यास किंवा त्यांच्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात हलविण्यास परवानगी देत नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, वॉर्डबाहेर सुमारे ३० पोलीस कर्मचारी आणि संपूर्ण रुग्णालय परिसरात १०० हून अधिक पोलीस तैनात आहेत, ज्यामुळे त्यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. त्यांनी या परिस्थितीला वैद्यकीय उपचार नव्हे, तर “बेकायदेशीर नजरकैद” असे संबोधले. गीतांजली म्हणाल्या की, सोनम वांगचुक यांच्यासोबत कोणतीही अप्रिय घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी रुग्णालय प्रशासन आणि सरकारवर असेल.

त्यांनी सांगितले की, याच कारणामुळे त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचे दार ठोठावले असून या प्रकरणात तातडीने सुनावणीची मागणी केली आहे. याचिकेत न्यायालयाला विनंती करण्यात आली आहे की, सोनम वांगचुक यांची प्रकृती आणखी खालावण्यापूर्वी त्यांना त्यांच्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात हलविण्याची परवानगी द्यावी. गीतांजली यांनी असेही म्हटले की, आपल्या प्रिय व्यक्तीच्या उपचारासाठी रुग्णालय निवडण्याच्या अधिकारासाठी कोणत्याही कुटुंबाला व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करावा लागू नये.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande