बीड : ऊसतोडीला नकार दिल्याने मजुराचे अपहरण; अपघातात मजुराचा दुर्दैवी मृत्यू
बीड, 21 जुलै (हिं.स.)। केजमध्ये ऊसतोडीला जाण्यास नकार दिल्याने बळजबरीने पळवून नेलेल्या एका मजुराचा वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवनाथ नामदेव वायबसे असे या मृत मजुराचे नाव असून, अपघातानंतर जखमी मजुराला वाऱ्या
अपघातात मृत्यू


बीड, 21 जुलै (हिं.स.)। केजमध्ये ऊसतोडीला जाण्यास नकार दिल्याने बळजबरीने पळवून नेलेल्या एका मजुराचा वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवनाथ नामदेव वायबसे असे या मृत मजुराचे नाव असून, अपघातानंतर जखमी मजुराला वाऱ्यावर सोडून पळ काढणाऱ्या दोन जणांवर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

माजलगाव तालुक्यातील गव्हाणथडी येथील नवनाथ वायबसे यांनी ऊसतोडीसाठी घेतलेली आठ हजार रुपयांची उचल परत करत कामावर जाण्यास नकार दिला होता. मात्र, सिद्धेश्वर महादेव चौरे आणि सारंग हनुमंत चौरे नवनाथ यांना बळजबरीने दुचाकीवर बसवून पळवून नेले. प्रवासात त्याला दारू पाजण्यात आली. हे तिघे दुचाकीवरून धाराशिव जिल्ह्यातील कळंबकडे जात असताना केज-कळंब महामार्गावरील एका हॉटेलवर थांबले होते. यावेळी रस्ता ओलांडत असलेल्या नवनाथला एका मालवाहू पिकअपने (एमएच २५ पी ४५६४) आणि त्यानंतर एका प्रवासी टमटमने जोराची धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

या भीषण अपघातानंतर सोबत असलेल्या सिद्धेश्वर चौरे आणि सारंग चौरे यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवनाथला रस्त्यावरच सोडून पळ काढला. त्यांनी कुटुंबालाही या अपघाताची माहिती दिली नाही. नवनाथला कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सहायक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या आदेशानुसार दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande