
नांदेड, 21 जुलै, (हिं.स.)। नांदेड महानगर जिल्हा प्रभारी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगर जिल्हाची संघटनात्मक बैठक पार पडली. नांदेड शहर आणि जिल्ह्यातील पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
आगामी काळात विविध निवडणुकांच्या संदर्भामध्ये या बैठकीमध्ये ऊहापोह करण्यात आला. शहर आणि ग्रामीण भागामध्ये भारतीय जनता पक्षाचे संघटन वाढावे यावर ही भर देण्यात आला. यावेळी सरचिटणीस विजय येवनकर, शितल खांडिल, विजय गंभीरे उत्तर विधानसभा प्रमुख मिलिंद देशमुख तथा महानगरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis