
बीड, 21 जुलै (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे भाविकांनी मंदिरात दान केलेली तब्बल सव्वाकिलो चांदी तपासणीदरम्यान बनावट असल्याचे उघड झाले. या प्रकारामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, मंदिर प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी संबंधित दानाची चौकशी सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis