नांदेड : अंगणवाडी पदांसाठी मेगा भरती; 31 जुलैपर्यंत अर्जाची संधी
बीड, 21 जुलै (हिं.स.)। सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या महिलांसाठी महिला व बालविकास विभागाकडून मोठी संधी उपलब्ध झाली आहे. राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदांसाठी एकूण 4,943 रिक्त पदांची मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र म
अंगणवाडी पदासाठी मेगा भरती


बीड, 21 जुलै (हिं.स.)। सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या महिलांसाठी महिला व बालविकास विभागाकडून मोठी संधी उपलब्ध झाली आहे. राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदांसाठी एकूण 4,943 रिक्त पदांची मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र महिला उमेदवार 20 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत अर्ज करू शकतात.

पदांचा तपशील :

अंगणवाडी सेविका – 1,015 पदे

अंगणवाडी मदतनीस – 3,928 पदे

मासिक मानधन :

अंगणवाडी सेविका – ₹13,000

अंगणवाडी मदतनीस – ₹7,500

महत्त्वाच्या तारखा :

अर्ज स्वीकार – 20 ते 31 जुलै 2026

अर्ज छाननी – 3 ते 7 ऑगस्ट 2026

गुणवत्ता यादी पडताळणी – 10 ते 12 ऑगस्ट 2026

हरकती दाखल – 13 ते 26 ऑगस्ट 2026

अंतिम गुणवत्ता यादी व नियुक्तीपत्र – 27 ऑगस्ट 2026

कोण अर्ज करू शकतात? ग्रामीण तसेच शहरी भागातील पात्र महिला उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. बालकांचे शिक्षण, पोषण, आरोग्य सेवा आणि समाजसेवेची आवड असलेल्या महिलांसाठी ही उत्तम संधी आहे.

#कामाचे स्वरूप :

• बालकांचे पोषण, आरोग्य आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाची जबाबदारी • गर्भवती व स्तनदा मातांची नोंद व मार्गदर्शन • पूरक पोषण आहाराचे वितरण • पोषण ट्रॅकरवर माहिती अद्ययावत करणे • अंगणवाडी केंद्राचे व्यवस्थापन आणि शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी

अर्ज करण्यापूर्वी संबंधित जिल्ह्याची अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आरक्षण, आवश्यक कागदपत्रे आणि इतर अटींची खात्री करूनच अर्ज करावा.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande