कोल्हापूर - दिल्लीतील आंदोलकांवरील अत्याचाराविरोधात शिरोलीत सर्वपक्षीय निदर्शने
कोल्हापूर, 23 जुलै, (हिं.स.)। दिल्लीत शांततेने झालेल्या आंदोलनात विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ शिरोली पुलाची ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निषेध सभा घेऊ
शिरोलीत सर्वपक्षीय निदर्शने


कोल्हापूर, 23 जुलै, (हिं.स.)। दिल्लीत शांततेने झालेल्या आंदोलनात विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ शिरोली पुलाची ता. हातकणंगले जि. कोल्हापूर येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निषेध सभा घेऊन निदर्शने केली.

शिरोलीतील छ. शिवाजी महाराज पुतळ्यासमोर घेण्यात आलेल्या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे अनिल खवरे, सतिश रेडेकर, रणजीत केळूसकर, तात्यासो भाऊ पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना केंद्रातील तरुण आणि विद्यार्थी विरोधी भाजप सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला.

यावेळी शिवसेना ठाकरे गट शहर प्रमुख राजकुमार पाटील, उप शहर प्रमुख अशोक खोत, तसेच अशोक कांबळे, निवास कांबळे, हरी पुजारी, सर्जेराव डांगे, बाबासो बुधले, मधुकर पद्माई, अनिल कोळी, नितिन दळवी, संतोष बाटे, जयवंत स्वामी, शहाजी चव्हाण, विलास सुतार, अजित पाटील, रोहित खोचीकर, शमुवेल कुरणे, मिलिंद कांबळे, हंबीरराव संकपाळ, भूपाल वाघमारे, प्रविण वंदूरे पाटील आदि उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande