लातूरमध्ये पोलीस आता तुमच्या सोसायटीत उपक्रमाला सुरुवात
लातूर, 25 जुलै, (हिं.स.)। गेल्या १ जुलै पासून लातूर शहरातील १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत आतापर्यंत १७१ सोसायट्यांना भेटी देत ५,१३० हून अधिक नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. या उपक्रमांतर्गत बीट अंमलदार व ठाणे प्र
पोलीस तुमच्या सोसायटीत


लातूर, 25 जुलै, (हिं.स.)। गेल्या १ जुलै पासून लातूर शहरातील १० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत आतापर्यंत १७१ सोसायट्यांना भेटी देत ५,१३० हून अधिक नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला.

या उपक्रमांतर्गत बीट अंमलदार व ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली. तसेच सायबर गुन्हे, महिला सुरक्षा, वाहतूक नियम, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर व आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांशी संपर्क याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे नागरिक व पोलीस यांच्यातील विश्वास, संवाद आणि सहकार्य अधिक दृढ करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली. हा अभिनव उपक्रम पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असून, नागरिकांकडून त्याचे मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande