लातूर - आनंदनगर नांदेडनाका येथे विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन संपन्न
लातूर, 25 जुलै (हिं.स.)। आनंद नगर नांदेडनाका परिसरातील नगर परिषदेच्या जागेमध्ये आनंदनगर परिसरातील रहिवाशांच्या मागणीनुसार आमदार संजय बनसोडे यांनी या परिसरातील महिला, पुरुष, विद्यार्थ्यांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणीसाठी निध
विरंगुळा केंद्र


लातूर, 25 जुलै (हिं.स.)। आनंद नगर नांदेडनाका परिसरातील नगर परिषदेच्या जागेमध्ये आनंदनगर परिसरातील रहिवाशांच्या मागणीनुसार आमदार संजय बनसोडे यांनी या परिसरातील महिला, पुरुष, विद्यार्थ्यांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला. त्या अनुषंगाने उदगीर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा स्वाती हुडे व उपनगराध्यक्षा शितल कांबळे यांच्या हस्ते विरंगुळा वास्तूचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच आनंदनगर परिसरातील नागरिकांच्या वतीने नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी या परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

शिवाजीराव जायभाये, दादाराव दाडगे, एस. एस. पाटील, ललिता झिल्हे,रोहिदास पांचाळ, कलकोटे नंदकुमार, महादू गठोडे, विद्यासागर नावंदीकर, मनोहर गरड, आकाश झिल्हे, रोहन अल्टे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande